Ajit Pawar । “…त्यांच्या घरी आयाबहिणी नाहीत काय?; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar

Ajit Pawar । राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणुकीच्या (Loksabha election) तोंडावर चांगलीच तयारी करताना दिसत आहे. ठिकठिकाणी अजित पवार सभा घेत आहेत. नुकतेच अजित पवार भाजपा उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचारासाठी अमरावतीत आले होते. प्रचारसभेदरम्यान, अजित पवार यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Latest marathi news)

Viral Video । रील बनवताना मुलीने करोडोंच्या कारचे नुकसान केले… व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

संविधानाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे. “बाबासाहेबांनी या देशासाठी उत्तम संविधान दिलं असून जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही. सांगायला काही नाही म्हणून घटना बदलणार असल्याचं विरोधक सांगत आहेत,” असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

Crime । गुन्हेगार महिलेसोबत लिफ्टमध्ये करू लागला जबरदस्ती; त्यानंतर गार्डने…

“आम्ही 2014 मध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. तसेच त्यांना आम्ही 2019 मध्ये पाठिंबा दिला. आताही आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आगामी निवडणुकीत तुम्ही नवनीत राणा यांना मतदान करा. समजा आम्ही जर तुमचे कामे केले नाही तर आम्हाला विधानसभेमध्ये उभे करू नका. आम्हाला चले जावं म्हणा, असं सांगतानाच विरोधक राणा यांच्यावर आरोप करतात. जे आरोप करतात त्यांच्या घरी आईबहिणी नाही का?” असा परखड सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Raut । संजय राऊतांनीची फडणवीसांवर जहरी टीका; म्हणाले…

Spread the love