Maratha Reservation । मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला उच्च न्यायालयात आव्हान, आज होणार महत्त्वाची सुनावणी

Maratha Reservation

Maratha Reservation । राज्य सरकारकडून (State Govt) 26 जानेवारी 2024 रोजी मराठा आरक्षणाच्या संदर्भात अधिसूचना मसुदा जारी करण्यात आला होता. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे आता त्यांना सगे सोयरे प्रमाणपत्र दिले जाईल, असे जाहीर केले होते. पण आता न्यायालयात ओबीसी वेल्फेअर फाउंडेशन (OBC Welfare Foundation) मराठा आरक्षणाला आव्हान दिलं आहे. (Latest marathi news)

Amrita Fadnavis । अमृता फडणवीसांचा उखाण्यातून विरोधकांवर निशाणा, “देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण…”

या प्रकरणावर सुरुवातील तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने (High Courts) नकार दिला होता. पण या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय न्यायाधीश आणि आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडेल. सरकार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर प्रभाव टाकत आहे, असे जनहित याचिकेमध्ये नमूद केले आहे.

Crime news । रक्षकच बनले भक्षक! पोलिसांनी केला महिला ऊसतोड मजुरावर बलात्कार

अशातच मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि मराठा आरक्षण लागू व्हावं, यासाठी आमरण उपोषण करणार आहे; असे मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. काही जण सरकारची सुपारी घेऊन सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत. त्यांना पद पैसे हवे आहे. मराठा समाजातील जे लोक विरोधात लिहित आहेत त्यांच्यासाठी मरायला देखील तयार आहे. त्यांनीही १० तारखेनंतर अंतरवाली सराटीमध्ये येवून बसावं, असंही आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे.

Ajit Pawar । शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले; “माझ्या वक्तव्याचा…”

Spread the love