Crime news । रक्षकच बनले भक्षक! पोलिसांनी केला महिला ऊसतोड मजुरावर बलात्कार

Crime news

Crime news । सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक बनले आहेत. एका पारधी समाजाच्या ऊसतोड महिला मजुरावर 2 पोलिसांनी अत्याचार (Crime)केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Police Raped Sugarcane Cutting Work)

Ajit Pawar । शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले; “माझ्या वक्तव्याचा…”

याबाबत बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोशल मीडियावर (Social media) माहिती दिली आहे. पीडित महिला ऊसतोड मजूर तिच्या मुलांना भेटण्यासाठी बार्शी येथे जात होती. त्यावेळी बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दिर थांबले असतांना त्यांना चोर असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपींच्या मोबाईलवर पैसे दिले. (Latest marathi news)

Ganpat Gaikwad Case Update । मोठी बातमी! आमदार गणपत गायकवाड गोळीबारप्रकरणी पोलिसांच्याही अडचणीत वाढ

हे प्रकरण इथपर्यंतच थांबले नाही. आरोपींनी पीडित महिलेला दमदाटी करून महिलेवर अत्याचार केला आणि तिला धमकीही दिली. उस्मानाबादमधील भूममध्ये ही घटना घडली असून 1 आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे. यावरून आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून आरोपींना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी केली आहे.

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात महिलांचा तुफान राडा; पोलिसांनी दिला महिलांना चोप; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Spread the love