Maharashtra Politics । ‘गुंड, दरोडेखोरांनी ढापलं सरकार’, ठाकरे गटाकडून सामनातून शिंदे, अजित पवारांवर निशाणा

Maharashtra Politics

Maharashtra Politics । भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटातील नेत्यावर गोळीबार केल्याने राज्यातील राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर (State Govt) हल्ला चढवला जात आहे. अशातच आता ‘सामना’तून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)

Maratha Reservation । मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला उच्च न्यायालयात आव्हान, आज होणार महत्त्वाची सुनावणी

सामनाच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्र्यासोबत दिपक सपकेंचा फोटो छापला आहे. सिमीशी कनेक्शन असणारा गुन्हेगार आसीफ दाढी याने अजित पवार (Ajit Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा फोटो देखील छापला आहे. खासदार श्रीकांत शिंदेच्या वाढदिवासानिमित्त पुण्यातील गुंड हेमंत दाभेकर हा वर्षा बंगल्यावर शुभेच्छा देतानाचा फोटो छापला आहे.

Amrita Fadnavis । अमृता फडणवीसांचा उखाण्यातून विरोधकांवर निशाणा, “देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण…”

इतकेच नाही तर मिंद्याचं जंगलराज गुंड, दरोडेखोरांनी ढापलं सरकार या आशेयाची बातमी सामानातून देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केलेल्या टीकेवर आता राज्य सरकार कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Crime news । रक्षकच बनले भक्षक! पोलिसांनी केला महिला ऊसतोड मजुरावर बलात्कार

Spread the love