Ajit Pawar । शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले; “माझ्या वक्तव्याचा…”

Ajit Pawar

Ajit Pawar । राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बारामती मतदारसंघात गेले होते. तेव्हा त्यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यावरून त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. यावर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Ajit Pawar on Sharad Pawar)

Ganpat Gaikwad Case Update । मोठी बातमी! आमदार गणपत गायकवाड गोळीबारप्रकरणी पोलिसांच्याही अडचणीत वाढ

“काल माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) एकत्र असल्यापासून इतकेच मत होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या शारीरिक दगदगीचा विचार करून प्रकृतीची काळजी घ्यावी. माझं हे मत मी पूर्वी देखील मांडलं आहे. पण काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहत आहेत,” असा आरोप अजित पवारांनी केला आहे. (Latest marathi news)

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात महिलांचा तुफान राडा; पोलिसांनी दिला महिलांना चोप; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढे ते म्हणाले की, “शरद पवारांबद्दलच्या माझ्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करण्याची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी कसलेच महत्त्व देत नाही. पण सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे मत मांडत आहे,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी यावेळी दिले आहे.

Ganpat Gaikwad । मोठी बातमी! आमदार गणपत गायकवाड यांनी केला अन्नत्याग

Spread the love