Amrita Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. तितक्याच त्यांच्या पत्नी अमृता फडवणीस या देखील चर्चेत असतात. त्यांची गाणी, अल्बम्स यासह त्या रोखठोक भूमिकेसाठीदेखील अमृता फडणवीस ओळखल्या जातात. यावेळी त्यांनी एका उखाण्यातून अनोख्या पद्धतीने विरोधकांवर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)
Crime news । रक्षकच बनले भक्षक! पोलिसांनी केला महिला ऊसतोड मजुरावर बलात्कार
नागपूरमध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन केले होते. यावेळी अमृता फडणवीस यादेखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमात उपस्थितांनी अमृता फडणवीस यांना उखाणा घेण्याचा आग्रह केला.
“देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वान, आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण,” असा उखाणा अमृता फडणवीस यांनी घेतला. यावेळी उपस्थितांनी देखील त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असणाऱ्या आरोप-प्रत्यारोमांमध्ये आता अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या उखाण्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
Ganpat Gaikwad Case Update । मोठी बातमी! आमदार गणपत गायकवाड गोळीबारप्रकरणी पोलिसांच्याही अडचणीत वाढ