Crime News । सोशल मीडियावरच प्रेम तरुणाला पडलं महागात, तरूणीचा नको त्या अवस्थेत व्हिडीओ कॉल आणि..

Crime News

Crime News । हल्ली सोशल मीडियाचा (Social media) वापर खूप वाढला आहे. जरी सोशल मीडियामुळे जग जवळ आले असले तरी सोशल मीडियामुळे खूप नुकसान देखील होत आहेत. याच्या वापरामुळे अनेक गुन्हे देखील होत आहेत. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाला सोशल मीडियाचा वापर (Social media use) खूप महागात पडला आहे.

Crime News । धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होते नको ते धंदे, पोलिसांनी केली ३ महिलांची सुटका

घाटकोपरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरूणाशी ओळख वाढवून, प्रेमात पाडून त्याची लाखोंची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी तरूणीने त्या तरूणाला नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करून त्यालाही नग्न होण्यास सांगितले. (Latest marathi news)

Eknath Shinde । काँग्रेसला मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दणका, शहराध्यक्षांचा 7 माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीने त्याच्या नकळतच त्याचे शूटिंग केले. त्या तरूणीनेथोड्या दिवसांनी तरूणाला त्याचा व्हिडीओ पाठवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. संपूर्ण प्रकरणामुळे त्या तरूणाला खूप मोठा धक्का बसला होता. तरीही त्या तरुणाने पैसे देण्यास नकार दिले. पण बदनामीच्या भीतीने त्या तरूणाने त्या तरुणाने 1 लाख 56 हजार रुपये दिले. तरुणाला त्रास सहन न झाल्याने त्याने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

HSC-SSC Result 2024 । विद्यार्थ्यांनो, ‘या’ तारखेपर्यंत लागणार दहावी-बारावीचा निकाल; पहा सविस्तर माहिती

Spread the love