Sharad Pawar । शरद पवारांना बसणार मोठा धक्का; जवळचा नेता सोडणार साथ

Sharad Pawar

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या सगळीकडे फिरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. अनेक नेते पक्षांतर करत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

Crime News । सोशल मीडियावरच प्रेम तरुणाला पडलं महागात, तरूणीचा नको त्या अवस्थेत व्हिडीओ कॉल आणि..

सोलापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यां नंतर अभिजित पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Crime News । धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होते नको ते धंदे, पोलिसांनी केली ३ महिलांची सुटका

माध्यमांशी बोलताना अभिजित पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. मी कारखाना वाचवण्यासाठी कुठेही जायला तयार असल्याचे अभिजित पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, अभिजीत पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र शिखर बँकेने ते अध्यक्ष असलेला विठ्ठल सहकारी सील केल्यामुळे नाईलाजाने त्यांना भाजपमध्ये जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Eknath Shinde । काँग्रेसला मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दणका, शहराध्यक्षांचा 7 माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश

Spread the love