Eknath Shinde । काँग्रेसला मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दणका, शहराध्यक्षांचा 7 माजी नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde

Eknath Shinde । राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha election) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पण काही जागांवर पेच कायम आहे. पक्षाने तिकीट नाकारल्याने काही नाराज नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. (Loksabha election 2024)

HSC-SSC Result 2024 । विद्यार्थ्यांनो, ‘या’ तारखेपर्यंत लागणार दहावी-बारावीचा निकाल; पहा सविस्तर माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी अंबरनाथमधील काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील (Pramod Patil) यांनी 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिंदे पिता-पुत्राच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आपण शिंदे गटात प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली आहे.

Ajit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवारांचा धक्कादायक गौप्यस्फोट

प्रदीप पाटील यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, प्रदीप पाटील हे 1995 पासून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक आहेत. तसेच ते माजी विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत. अंबरनाथ शहरात प्रदीप पाटील यांनी मागील अनेक वर्षे काँग्रेसची एकहाती धुरा सांभाळली आहे. या भागात त्यांचा चांगला दबदबा आहे, ज्याचा शिंदे गटाला फायदा होईल.

Viral News । लग्नापूर्वीच नवरदेवाचं धक्कादायक कांड, नवरीसह कुटुंबीय पोहोचले पोलिस स्टेशनमध्ये

Spread the love