HSC-SSC Result 2024 । विद्यार्थ्यांनो, ‘या’ तारखेपर्यंत लागणार दहावी-बारावीचा निकाल; पहा सविस्तर माहिती

HSC-SSC Result 2024 । यावर्षी दहावीच्या परीक्षेला (SSC) 17 लाख विद्यार्थी तर बारावीच्या (HSC) परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी निकालाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC Result) आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत (HSC Result) महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! अजित पवारांचा धक्कादायक गौप्यस्फोट

दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी तर बारावीचा 25 मे ला लागणार आहे. (HSC-SSC Result Date) तसेच विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा पार पडणार आहे. दरम्यान, बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जातोय. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापूर्वी नोंदवून ठेवले आहेत. सध्या उत्तरपत्रिका तपासून जशा पूर्ण होतील तसे गुणपत्रिका तयार होत आहेत.

Viral News । लग्नापूर्वीच नवरदेवाचं धक्कादायक कांड, नवरीसह कुटुंबीय पोहोचले पोलिस स्टेशनमध्ये

यंदा परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढली आहे, अशी माहिती समोर आली आहे. याची माहिती राज्य मंडळाकडून घेतला जात आहे. दरम्यान, अगोदर निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर ते विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा आणि कॉलेजमध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

Eknath Shinde । ‘एकनाथ शिंदे मध्यरात्री अधिकाऱ्यांना भेटले आणि…’, काँग्रेसचा धक्कादायक आरोप

Spread the love