Lok Sabha Election 2024 । लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज होणार मतदान

Loksabha Election 2024

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमधील 88 जागांसाठी आज म्हणजेच 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या टप्प्यात केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे, जिथून काँग्रेस नेते राहुल गांधी सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. केरळच्या सर्व 20 जागांव्यतिरिक्त, कर्नाटकच्या 28 जागांपैकी 14, राजस्थानच्या 13 जागा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या प्रत्येकी 8 जागा, मध्य प्रदेशच्या सहा जागा, आसाम आणि बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी पाच जागांवर मतदान होत आहे. शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी तीन आणि प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे.

Sharad Pawar । शरद पवारांनी सुजय विखे यांना झापल; म्हणाले…

महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ८ जागांसाठी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ८ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, कोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, या मतदारसंघाचा समावेश आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात किती टक्के मतदान होतं, हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Nashik Election । छगन भुजबळांचा नाशिकच्या जागेबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, या निवडणुकीत लोकांच्या नजरा महाराष्ट्राच्या अमरावती मतदारसंघावर लागल्या आहेत. भाजपने नुकत्याच पक्षात प्रवेश केलेल्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत नवनीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या विरोधात लढत आहेत. नवनीत राणा यांनी 2019 ची निवडणूक अपक्ष म्हणून जिंकली होती. त्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघात ६०.७६ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Fire News । हॉटेलला भीषण आग! सहा जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love