Fire News । हॉटेलला भीषण आग! सहा जणांचा होरपळून मृत्यू

Fire News । मागील काही दिवसांपासून आगीच्या (Fire) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या देखील आगीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाटण्यात भीषण अग्नितांडव झाल्याची घटना घडली असून या घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. (Latest marathi news)

Devendra Fadnavis । “त्यांचे जुने व्हिडिओ काढल्यास…”, शरद पवारांच्या ‘त्या’ ऑडिओवर फडणवीसांचा पलटवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा स्टेशनच्या जवळ पाल हॉटेल आणि रेस्टॉरंटला आग लागली. त्यानंतर सिलिंडरचा ब्लास्ट झाला. दोन जणांचा मृत्यू घटनास्थळी झाला होता. तर चार लोकांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. या घटनेनंतर तातडीने फायर ब्रिगेडच्या टीमला बोलावण्यात आले. पण त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले.

Viral News । धक्कादायक! भर मंडपात नवरदेवानं केलं असं काही कृत्य की..

धक्कादायक बाब म्हणजे जोरदार वारं सुटले असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले होते. आजूबाजूच्या परिसरात आग पसरु नये यासाठी विद्युत पुरवठा खंडीत केला होता.अनेक गाड्यांची आग विझवण्यासाठी खूप वेळ लागला. हॉटेलमध्ये लागलेल्या आगीनंतर ४५ लोकांना रेस्क्यू करत सुखरुप बाहेर काढलं आहे तर ३८ लोकांवर उपचार सुरु आहेत.

Ajit Pawar । “म्हणून मी भाजपसोबत गेलो”, अखेर अजित पवार यांनी केला मोठा खुलासा

Spread the love