Nashik Election । छगन भुजबळांचा नाशिकच्या जागेबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट

Nashik Election । मागील अनेक दिवसांपासून महायुतीच्या नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स पहायला मिळत आहे. खुप चर्चा झाल्यानंतर उमेदवार अधिकृतपणे जाहीर झाला नाही त्यामुळे आपण माघार घेत आहे,” असे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले होते. अशातच मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Latest marathi news)

Fire News । हॉटेलला भीषण आग! सहा जणांचा होरपळून मृत्यू

“नाशिकमधून मी फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मला फोन करून शिरूरमधून लढता का असं विचारलं होतं. शिरुर मतदार संघामधून महायुतीकडून आढळराव पाटील (Adhalrao Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान आढळराव पाटील हे शिवसेना शिंदे गटात होते. पण उमेदवारीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.”

Devendra Fadnavis । “त्यांचे जुने व्हिडिओ काढल्यास…”, शरद पवारांच्या ‘त्या’ ऑडिओवर फडणवीसांचा पलटवार

“सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिरूरमध्ये मोठया प्रमाणात ओबीसी समाज आहे. मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागचा हेतू होता. विजय वडेट्टीवार माझ्याबद्दल चांगले बोलले मी त्यांचे आभार मानतो. त्यांचं माझ्यावर प्रेम असल्याने ते बोलले असतील. पक्षाच्या अडचणीमुळे ते माझ्यासोबत व्यासपीठावर येत नाहीत. त्याला मी पुतना मावशीचे प्रेम म्हणणार नाही,” असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

Viral News । धक्कादायक! भर मंडपात नवरदेवानं केलं असं काही कृत्य की..

Spread the love