Baramati Loksabha । सुनंदा पवार यांचं खळबळजनक वक्तव्य’ म्हणाल्या, “दोन-तीन दिवसांमध्ये…”

Baramati Loksabha । महाराष्ट्रात बारामतीच्या जागेवर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) यांच्यातच लढत आहे, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. सत्ताधारी आणि विरोधक लोकसभेच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार (Sunanda Pawar) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

Lok Sabha Election 2024 । लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज होणार मतदान

त्या प्रचारादरम्यान बारामती येथील जळगाव सुपे येथे बोलत होत्या. बोलताना त्या म्हणाल्या की, “आज बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये अनोळखी लोकं दिसत आहेत. विविध भाषेत बोलणारी लोकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होण्याची शक्यता आहे,” असं वक्तव्य सुनंदा पवार यांनी केलं आहे.

Sharad Pawar । शरद पवारांनी सुजय विखे यांना झापल; म्हणाले…

दरम्यान, पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघात यंदा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. अटीतटीच्या सामन्यात बारामतीकर कोणाला निवडून देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जरी ही लढत नणंद विरुद्ध भावजय अशी असली तरी खरी लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार (Sharad Pawar Vs Ajit Pawar) अशीच असणार आहे.

Nashik Election । छगन भुजबळांचा नाशिकच्या जागेबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट

Spread the love