Sharad Pawar । शरद पवारांनी सुजय विखे यांना झापल; म्हणाले…

Sharad Pawar । राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरु असून दिवसेंदिवस निवडणुकांमुळे राज्याचे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहे. आगामी निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे सरकार येणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. खासदार शरद पवार यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sharad Pawar on Sujay Vikhe Patil)

Nashik Election । छगन भुजबळांचा नाशिकच्या जागेबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे पाटलांनी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना इंग्रजीतून भाषण करून दाखवा, असे आव्हान दिले होते. शरद पवार हे निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. “मी इंग्रजी बोलतो म्हणजे मी खूप शहाणा झालो असं होत नाही. तुमचं इंग्रजी तुम्हाला लाखलाभ असो, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

Fire News । हॉटेलला भीषण आग! सहा जणांचा होरपळून मृत्यू

पुढे शरद पवार म्हणाले की, “राहुरी कारखान्यावर राज्यभरातील मंत्रिमंडळातील अनेक लोक येऊन गेले आहेत. कारण सहकारातील उत्तम कारखाना कसा आहे तो पाहण्यासाठी मोठे नेते यायचे पण याच कारखान्याची सुजय विखेंनी काय वाट लावली हे मी सांगू इच्छित नाही. ज्यांच्या हातात दहा वर्षे सत्ता होती. त्यांनी आतापर्यंत देशासाठी काय केलं आहे, त्याचा हिशोब मागण्याची ही निवडणूक आहे,” असेही शरद पवार म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis । “त्यांचे जुने व्हिडिओ काढल्यास…”, शरद पवारांच्या ‘त्या’ ऑडिओवर फडणवीसांचा पलटवार

Spread the love