IPL 2024 । धक्कादायक! आयपीएलमुळे एका चाहत्याचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

IPL 2024

IPL 2024 । सध्या आयपीएलचा थरार सुरु आहे. गतवर्षी चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) विजेतेपदक आपल्या नावावर केले होते. यंदाही हा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. आयपीएलमधील संघांनुसार चाहत्यांनी खेळाडूंना देखील वाटून घेतले आहे. पण याच आयपीएलमुळे (IPL) एका चाहत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार? मोठी माहिती समोर

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर सोशल मीडियावर जणू काही मुंबई इंडियन्सविरोधात मोहीम सुरु झाली होती. पण कोल्हापूर शहरात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या एकाला जबर मारहाण करण्यात आली होती. यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

Supriya Sule । यंदाच्या निवडणुकीत जिंकून येणार का? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या….

माहितीनुसार, कोल्हापूरमधील हणमंतवाडी (ता.करवीर) येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले, सागर झांजगे आणि बळवंत झांजगे आयपीएलचा सामने पाहत होते. बुधवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) असा हा सामना सुरु होता. त्यावेळी रोहित शर्मा बाद झाला. बंडूपंत तिबिले हा क्षण साजरा केला. पण याचा राग सागर झांजगे आणि बळवंत झांजगे यांना आला. त्यांनी बंडूपंत तिबले यांना दांडक्याने जबर मारहाण केली. त्यात बंडूपंत हे गंभीर जखमी झाले होते. पण आता उपचारादरम्यान, बंडूपंत यांचा मृत्यू झाला आहे.

Ajit Pawar । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

Spread the love