Sharad Pawar । साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार? मोठी माहिती समोर

Sharad Pawar

Sharad Pawar । शरद पवार यांनी पाच जागेवर उमेदवार जाहीर केली आहे. शरद पवार यांच्या पक्षाने बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे आणि वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी दिली आहे, तर दिंडोरीतून भास्करराव भगरे आणि अहमदनगरमधून नीलेश लंके यांना तिकीट दिले आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या यादीत साताऱ्याची जागा जाहीर झालेली नाही. श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याठिकाणी शरद पवार कोणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा केली.

Supriya Sule । यंदाच्या निवडणुकीत जिंकून येणार का? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या….

साताऱ्याची जागा अद्याप जाहीर झालेली नाही. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) साताऱ्यातून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार ही जागा काँग्रेससाठी सोडणार का? सोडले तर त्या बदल्यात राष्ट्रवादीला कोणती जागा मिळणार? सस्पेन्स अजूनही कायम आहे.

Ajit Pawar । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

दरम्यान, नितेश कराळे गुरुजी वर्ध्याच्या जागेसाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची तीनदा भेट घेतली. वर्ध्याची जागा का द्यायची हेही त्यांनी शरद पवारांना सुनावले. काल कराळे गुरुजींनीही ही जागा मिळवण्यासाठी शरद पवार गटात प्रवेश केला. अशा स्थितीत कराळे गुरुजींना वर्ध्याची जागा मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र शरद पवार गटाने कराळे गुरुजींऐवजी अमर काळे यांना तिकीट दिले आहे. यामुळे कराळे गुरुजी निराश झाले आहेत.

Manoj Jarange Patil । निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा

Spread the love