Supriya Sule । यंदाच्या निवडणुकीत जिंकून येणार का? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या….

Supriya Sule

Supriya Sule । नुकतीच शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. (Loksabha election) तसेच अजित पवार गटाकडून देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Sunetra Pawar vs Supriya Sule)

Ajit Pawar । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का!

सुप्रिया सुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) दौऱ्यावर असून त्यांनी मतदारांना मला पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावं, अशी विनंती केली आहे. “माझ्यासाठी वैचारिक लढाई कोणत्या व्यक्तीशी नाही. मी कोणावरही वयक्तिक टीका केली नाही. महागाई, बेरोजगारी, दडपशाही विरोधात माझी लढाई असणार असून मला पुन्हा संधी मिळाली आहे. माझं मेरिट पाहून मला मतदान करा,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. (Latest marathi news)

Manoj Jarange Patil । निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा

“आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागत आहे. मोठ्या भावाची बायको ही आई प्रमाणे असते. त्यांना आमच्या आईला निवडणुकीत उतरून भाजपला निवडणूक लढावी लागते ही किती दुर्दैवाची बाब आहे. हेच भाजपचं राजकारण आहे,” असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दरम्यान, आता नणंद विरुद्ध भावजय लढतीत कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Maharashtra Politics । राजकीय वर्तुळात खलबतं! उमदेवारी जाहीर होताच निलेश लंके मध्यरात्री बाळासाहेब थोरातांच्या भेटीला

Spread the love