Prakash Ambedkar । मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे वाढणार महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी?

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar । ऐन निवडणुकीच्या काळात (Loksabha election) राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज नागूपर दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढू शकते. (Latest marathi news)

IPL 2024 । धक्कादायक! आयपीएलमुळे एका चाहत्याचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

“अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत एकमत झालं नाही हे आम्ही सांगतो होतो. पण ते आता स्पष्ट झालं असल्याने उमेदवारांची यादी जाहीर होत नाही. या तिन्ही पक्षांच्या वेगळवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. ते मैत्रीपूर्ण पद्धतीची संकल्पना मांडत असून हे आम्हाला अगोदर माहीत होतं. यामुळे आम्ही त्यांना पहिलं तुम्हीच वाद मिटवा म्हटलं होत,” असे स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

Sharad Pawar । साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार? मोठी माहिती समोर

“दरम्यान, महाविकास आघाडीचं भांडण मिटत नाही. याच कारणामुळे महाविकास आघाडी आम्हाला कोणत्या जागा लढायला पाहिजे, याची माहिती देत नाही. जर आम्ही महाविकास आघाडीत गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता. आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून पाठिंबा देत आहे, असे सांगितलंआहे,”असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Supriya Sule । यंदाच्या निवडणुकीत जिंकून येणार का? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या….

Spread the love