Loksabha Election । लोकसभेत भाजपने उघडलं विजयाचं खातं, ‘या’ मतदारसंघात उधळला गुलाल

Loksabha Election

Loksabha Election । अबकी बार ४०० पार अशी घोषणा भाजपकडून (BJP) आगामी निवडणुकीत केली जात आहे. आगामी निवडणुकीत आम्ही ४०० जागा जिंकू असा दावा भाजपकडून केला जात आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. नुकतेच पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. (Loksabha Election 2024)

Jitendra Awhad । बिग ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या निशाण्यावर, लाखोंची मागणी करत…

भाजपसाठी राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपसाठी गुजरातमधून आनंदाची बातमी आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाली तर उर्वरित 8 उमेदवारांनीही आपली नावे मागे घेतली आहे. त्यामुळेच या जागेवर भाजपचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने विजयाचे खातेही उघडले आहे.

Sharad Pawar । भरसभेत शरद पवारांनी मान्य केली चूक, म्हणाले; “पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची माफी…”

सुरत लोकसभा मतदारसंघातील मुकेश दलाल (Mukesh Dalal) येथून भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी (Nilesh Kumbhani) यांना त्यांच्या तीनपैकी एकही प्रस्तावक निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडता आला नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. पण उमेदवारी नाकारल्याचा ठपका काँग्रेसकडून सरकारवर ठेवण्यात आला आहे.

Ravi Kishan । भाजप उमेदवार रवी किशन यांच्याविरोधात खटला दाखल, नेमकं कारण काय?

Spread the love