Manoj jarange Patil । मराठा समाज (Maratha reservation) ओबीसींमधून आरक्षण मिळावं आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आंदोलन करत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वी त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केले आहे. (Latest marathi news)
Accident News । लग्नसोहळा आटोपून परतताना काळाचा घाला! 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी
बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “माझी भूमिका राजकीय नाही, समाज माझा मालक आहे. देवेंद्र फडणवीस हे चुकीच्या जागी भिडले असून बीड जिल्ह्यात 3400 उमेदवारांचे फॉर्म झाले आहेत असं म्हणत घ्या आता डबरीवर बॅलेट पेपर अंथरणार का? आता आमच्या वावरात मतदान केंद्र टाकावे लागणार असे म्हणत कसे आमच्या वावरात येतात बघतो,” असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
Maharashtra Politics । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्याला आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स
“मराठा समाजाने केसेसला तयार रहा. केस झाली की खुश व्हा आणि लगेच कोर्टात जाऊन जामीन करुन घ्या. जामीन करायला मराठा वकिलांची फौज तयार असून उद्यापासून पंतप्रधानांपासून राष्ट्रपतीपर्यंत मराठ्यावर अन्याय होत आहे, मेल पाठवायची महिम सुरु करुन एकाही नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही,” असे पॉम्प्लेट दारावर चिटकून द्या,असे जरांगे पाटील म्हणाले.
Ajit Pawar । अन् भर कार्यक्रमात अजित पवारांना मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?