Chhagan Bhujbal । सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळांना मोठा दिलासा, ‘त्या’ प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट रद्द

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal । मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग कधीही निवडणुका जाहीर करू शकते. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Latest marathi news)

Manoj jarange Patil । जरांगेंचे मराठा बांधवांना आवाहन, म्हणाले; ‘नेत्यांना नो एन्ट्री, पंतप्रधानांपासून, राष्ट्रपतींपर्यंत मेल पाठवा’

भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयात हजर न राहिल्याने छगन भुजबळ यांच्याविरोधात गेल्या महिन्यात १६ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयाने जारी अजामीनपात्र वॉरंट केले होते. पण आज या प्रकरणी भुजबळ न्यायालयात हजर राहिल्याने रद्द केले आहे. त्यामुळे भुजबळ यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भुजबळ यांच्याविरोधात २०१५ मध्ये एका जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता.

Accident News । लग्नसोहळा आटोपून परतताना काळाचा घाला! 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी

महाराष्ट्र सदन बांधकामाच्या कंत्राटात अनियमितता, कलिना येथील जमिनीचा व्यवहार आणि तिथे वाचनालय उभारण्याच्या कंत्राटातील अनियमितता प्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर गुन्हे दाखल केले. या प्रकरणांतून आरोप मुक्त करण्याच्या भुजबळ आणि अन्य आरोपींच्या अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Maharashtra Politics । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्याला आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स

Spread the love