Ajit Pawar । अन् भर कार्यक्रमात अजित पवारांना मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?

Ajit Pawar

Ajit Pawar । पुणे : काल बारामतीमध्ये नमो महारोजगार या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी देखील हजेरी लावली. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीने शक्तीप्रदर्शन केलं. पण भर सभेमध्ये अजित पवारांना माफी मागावी लागली आहे. नेमकं कारण काय? जाणून घेऊयात सविस्तरपणे. (Ajit Pawar Latest Marathi News)

Sanjay Gaikwad । बिग ब्रेकिंग! संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणांमुळे होणार कारवाई

“छत्रपती संभाजी महाराज हे एकही निवडणूक लढले नाहीत, असं विधान अजित पवार यांनी आपल्या भाषणात केलं. त्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना करेक्शन सांगितलं आणि त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या विधानावर लगेचच माफी मागितली. आपल्याला लढाई म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

Accident News । शिवसेनेच्या आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीशिवाय काय समजत नाही. पण आमच्यामध्ये एक निष्णांत देवेंद्र फडणवीस आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे लक्षात आणून देतात. त्याबद्दल धन्यवाद देवेंद्रजी. असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या, असे कौतुकदेखील अजितदादांनी यावेळी केले.

Lok Sabha Elections । भाजपला मोठा धक्का! गौतम गंभीर पाठोपाठ आणखी एका खासदाराने घेतला राजकारणातून संन्यास

Spread the love