Maharashtra Politics । दिवसेंदिवस ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. कारण निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित करूनही ठाकरे गटाकडून पक्षनिधी काढल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. (Latest marathi news)
Accident News । शिवसेनेच्या आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांना चौकशीला हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. उद्धव ठाकरे गटाकडून पक्ष निधीमधून 50 कोटी रुपये काढले असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी EOW कडे तक्रार केली होती. त्यानंतर आता अनिल देसाई यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने अनिस देसाई यांना येत्या 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. त्यामुळे आता अनिल देसाई चौकशीला सामोरं जातात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनिल देसाई हे ठाकरेंचे अतिशय जवळचे नेते आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.