Havaman Andaj । हवामान खात्याने आज २१ राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय पुढील चार दिवस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 40 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने पाऊस आणि वारे वाहण्याची शक्यता आहे. या राज्यांव्यतिरिक्त हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, बिहार, झारखंड, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये आज पाऊस पडेल. येथे वाऱ्याचा वेग ताशी ३० किलोमीटर इतका असेल.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वादळ आणि पाऊस असूनही राज्यांमध्ये तापमानात फारशी घसरण झालेली नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रात सोमवारी तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. येत्या काही दिवसांत काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा उष्णतेची लाट येऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
राजस्थानमध्ये 15 मे ते 18 मे पर्यंत उष्णतेची लाट राहील. त्याच वेळी, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणामध्ये 16 मेपासून आणि मध्य-बिहारमध्ये 17 मेपासून उष्णतेची लाट कायम राहणार आहे. या राज्यांमध्ये तापमानातही वाढ होऊ शकते.
Rakhi Sawant । ब्रेकिंग! अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती खालावली; रुग्णालयामध्ये उपचार सुरु