Maratha Reservation । मोठी बातमी! मराठा समाजाचे प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार दोन उमेदवार

Maratha Reservation

Maratha Reservation । मराठा समाज ओबीसींमधून (OBC) आरक्षण मिळावं आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आंदोलन करत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. नुकतीच मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाने एक मोठा निर्णय निर्णय घेतला आहे. (Latest marathi news)

Sharad Pawar । … तर आम्ही तुमच्यासोबत राहू, शरद पवारांनी दिली सरकारला खात्री

आगामी लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे केले जाणार आहेत. या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल. पण इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे राहिले तर निवडणूक घेण्याचे आव्हानच प्रशासनासमोर येणार आहे.

Maharashtra Politics । राजकीय वर्तुळातून मोठी बातमी! बारामतीत शिवसेनेचा बडा नेता देणार अजितदादांना सर्वात मोठा धक्का

दरम्यान, जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी होणार असल्याने यावर मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 250 पेक्षा जास्त उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे. एकंदरीत मराठा आंदोलकांनी वेगळाच पवित्रा घेतल्याचे समोर आले आहे.

Police Recruitment । खुशखबर! राज्यात होणार तब्बल १६ हजार जागांवर पोलिसांची भरती

Spread the love