Lok Sabha Elections । भाजपला मोठा धक्का! गौतम गंभीर पाठोपाठ आणखी एका खासदाराने घेतला राजकारणातून संन्यास

Lok Sabha Elections

Lok Sabha Elections । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections 2024) पार पडणार आहेत. सर्व पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) कधीही निवडणुका जाहीर करू शकते. यंदाच्या निवडणुकीवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला (BJP) पुन्हा मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Maratha Reservation । मोठी बातमी! मराठा समाजाचे प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार दोन उमेदवार

नुकताच माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) राजकारणाला रामराम ठोकला आहे. अशातच आता भाजपचे खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनी त्यांना भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्याकडे त्यांना प्रत्यक्ष निवडणूक जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशा विनंती केली आहे. राजीनाम्यामागचे कारणही जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.

Sharad Pawar । … तर आम्ही तुमच्यासोबत राहू, शरद पवारांनी दिली सरकारला खात्री

जयंत सिन्हा यांनी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलाचा सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी निवडणूक जबाबदारीपासून मुक्त करण्याची मागणी केली आहे. गौतम गंभीरने अशाच प्रकारची पोस्ट करत जेपी नड्डा यांच्याकडे मागणी केली होती. गंभीरने मागणी केल्यानंतर काही तासात जयंत सिन्हा यांनी तशीच मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics । राजकीय वर्तुळातून मोठी बातमी! बारामतीत शिवसेनेचा बडा नेता देणार अजितदादांना सर्वात मोठा धक्का

Spread the love