Bacchu Kadu । बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना केलं कळकळीचं आवाहन, म्हणाले; “माझ्या मायची शपथ…”

Bacchu Kadu

Bacchu Kadu । केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या (Loksabha 2024) तारखा जाहीर करताच राजकीय नेत्यांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आज आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब (Dinesh Bub) यांनी अमरावती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून अर्ज दाखल केल्यानंतर प्रहार पक्षाकडून भव्य रॅली काढण्यात आली. (Latest marathi news)

Devendra Fadnavis । फडणवीसांचे खळबळजनक विधान, म्हणाले; “पवारसाहेब आपल्या पाठिशी”

यादरम्यान सभेत बोलताना बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना तसेच कळकळीचं आवाहनदेखील केलं. “कार्यकर्ते स्वत:चे पैसे खर्च करुन इथे आले आहेत. हीच प्रहारची खरी ताकद आहे. पण आता झोपू नका, कारण आता झोप उडवायचे दिवस आहेत.आता हार घेतली तर पुन्हा पैसेवाल्याची जीत होईल. हे लोक पुन्हा लोकशाही पैशांच्या समोर झुकून टाकणार”, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांच्यासाठी समोर आली सर्वात धक्कादायक बातमी!

“तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो. तुम्ही रोज पाच-सहा गाव फिरले पाहिजेत. खिशातले पाचशे ते हजार रुपये खर्च केल्याशिवाय ही निवडणूक जिंकता येणार नाही. समोर 500 कोटीचा मालक असून आपल्याला त्याच्यासमोर लढायचं आहे. हे पक्ष त्यांच्या पंगतीत बसले आहेत. पण आपल्याला ती पंगत तोडायची आहे. तुम्ही फक्त एकच लक्ष्य ठेवलं पाहिजे की, तुमचा आमचा स्वाभिमान,” असा सल्ला बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Congress | सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; बड्या नेत्याने दिली भाजपची साथ

Spread the love