Devendra Fadnavis । पुण्यातील अपघात प्रकरणामुळे देशातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सोशल मीडियावर देखील संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांवर देखील आरोप करण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुण्यातील घटना अस्वस्थ करणारी आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. मी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आतापर्यंत काय घडले आणि काय कारवाई केली जाईल याचा आढावा घेतला.”
Hsc Result । ब्रेकिंग! बारावीचा निकाल जाहीर, या ठिकाणी पाहा ऑनलाईन पद्धतीने निकाल
पुणे कार अपघात प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. फडणवीस यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सीपी कार्यालयात बैठक घेतली. पुणे कार अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना पुण्याच्या विशेष न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुण्यात पोर्श कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. एक अल्पवयीन मुलगा ही गाडी चालवत होता. आरोपीला अटक केल्यानंतर अवघ्या 15 तासांनंतर काही अटींसह जामीन मिळाला. ज्या अटींवर आरोपीला जामीन देण्यात आला त्यावर टीका होत आहे.
Pune Accident । पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट
पोलिसांना दिल्या महत्वाच्या सूचना
आज झालेल्या बैठकीमध्ये पुणे पोलिसांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे लोक बार किंवा पबमध्ये जातात त्यांच्याकडे लिगल डॉक्यूमेंट आहे की नाही ते चेक करा. या बार किंवा पबचा सीसीटीव्ही पोलीस किंवा एक्साईज विभाग चेक करतील.त्याचबरोबर पुण्यामध्ये झालेल्या घटनेसारख्या अजून घटना घडू नये म्हणून लाँग टर्मसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे, असं देखील उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Devendra Fadnavis । पुण्यात बिल्डरच्या मुलाने दोघांना चिरडलं, देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर; थेट..