Pune hit and run case । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दोन जणांचा बळी घेतलेल्या १७ वर्षीय आरोपीच्या वडिलांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . म्हणजेच ते २४ मेपर्यंत पोलिस कोठडीत राहणार आहेत.
पुणे दुर्घटनेमुळे लोक प्रचंड संतप्त झाले आहेत. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयात नेत असताना लोकांनी त्यांच्यावर शाई फेकली. प्रकरण वाढल्यानंतर पोलिसही सक्रिय झाले आणि अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानून हा खटला न्यायालयात चालवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पबचे २ कर्मचारीही न्यायालयात हजर
याशिवाय पबचे दोन कर्मचारी (नितेश शेवाणी आणि जयेश बोनकर) यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांनी चौकशी न करता आरोपींना पबमध्ये येऊ दिल्याचे सरकारी वकिलांनी युक्तिवादात सांगितले. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवालला ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.
Devendr Fadanvis । पोर्श गाडी बंगळुरमधून पुण्यात कशी आली? फडणवीसांनी केला सर्वात मोठा खुलासा