Congress । ब्रेकिंग! काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा भूकंप, बडा नेता करणार आज अजित पवार गटात करणार प्रवेश

Congress

Congress । मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, राजू वाघमारे आणि संजय निरुपम यांनी कॉग्रेसला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला आता आणखी पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे रायगडचे उमेदवार अनंत गीते यांच्याही अडचणी वाढणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले (Mushtaq Antule) आज अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश करणार आहेत.

Uday Samat । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक

सुनील तटकरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले साहेब यांचे राजकीय वारसदार आणि गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार दादा यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाट चालत आहे. सोमवार, दिनांक २२ एप्रिल २०२४ सकाळी ११ वाजता एमसीए लाउन्ज, गरवारे क्लब, वानखडे स्टेडियम मुंबई या ठिकाणी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी ट्विट करत दिली आहे.

Ahmdnagar Accident । अहमदनगरमध्ये भीषण अपघात! कंटेनर मोटरसायकलच्या अपघातात ३ तरुण जागीच ठार; कुटुंबावर मोठी शोककळा

उद्धव ठाकरेंच्याही अडचणीत वाढ

खरे तर महाराष्ट्रातील भारत आघाडीच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. येथे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अजित गटाने अशी खेळी केल्याने त्याचा फटका शिवसेनेला (यूबीटी) सहन करावा लागणार आहे.

Ram Satpute । राम सातपुते यांचे सर्वात मोठे वक्तव्य; म्हणाले, ” जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…”

Spread the love