Ahmdnagar Accident । सध्या अहमदनगरमधून अपघाताची एक अतिशय भीषण घटना समोर आली आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या निमोण गावाजवळ कंटेनर व पल्सर मोटरसायकल भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये आदिवासी कुटुंबातील तीन तरुणांचा जागीच मुत्यू झाला आहे.
नांदुर-शिंगोटे लोणी रस्त्यावर निमोण गावालगत हा अपघात झाला आहे. हा अपघात अपघात संगमनेर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने अपघाताची माहिती मिळताच संगमनेर पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनतर पंचनामा करून त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या अपघातामुळे तरुणांच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.
दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्यामुळे मोटरसायकल वरील तिघांचाही मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच नांदुर-शिंगोटे येथील आदिवासी बांधवांनी निमोन गावाकडे धाव घेऊन त्वरित बचाव कार्य केले मात्र तिन्ही तरुण जागेवरच ठार झाले होते.