Ram Satpute । राम सातपुते यांचे सर्वात मोठे वक्तव्य; म्हणाले, ” जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत…”

Ram Satpute । सोलापूर : राज्यात अजूनही मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा प्रलंबित आहे. राज्य सरकारने जरी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी मराठा समाज ओबीसींमधून आरक्षण मिळावे, ही मागणी करत आहे. सध्या राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात प्रचारसभा घेताना दिसत आहे. भाजप आमदाराने मोठी घोषणा केली आहे. (Maratha reservation strike)

Madhya Pradesh Police । धक्कादायक बातमी! इलेक्शन ड्युटीवर परतणाऱ्या पोलिसांच्या बसला भीषण अपघात; १० जण जखमी

सोलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून भाजप आमदार राम सातपुते (Praniti Shinde vs Ram Satpute) यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार प्रचारसभा घेत आहे. आज भगवान महावीर जयंती निमित्त सोलापुरात जैन बांधवान कडून काढलेल्या शोभायात्रेत राम सातपुते यांनी मराठा आरक्षणावर महत्वाचे विधान केले आहे.

Sharad Pawar । निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी केला सर्वात मोठा दावा; म्हणाले…

“जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही. निवडून आल्यानंतरही मी फेटा घालणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी फेटा बांधणार आहे,” असा संकल्प राम सातपुते केला आहे. तसेच त्यांनी मशिदीतून फतवे काढून संविधानाला आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत, असा आरोप केला आहे.

Baba Ramdev । ब्रेकिंग! बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा पुन्हा मोठा धक्का

Spread the love