Sharad Pawar । शरद पवारांनी रात्रीत बदलली समीकरण, ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी

Sharad Pawar

Sharad Pawar । मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेत येत आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांना माढा लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. पण महाविकास आघाडीत असलेले शेकापचे नेते अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) हे बंडाच्या तयारीत होते. पण खासदार शरद पवारांनी एका रात्रीत समीकरण बदलली आहेत. (Latest marathi news)

Crime News । धक्कादायक! मैत्रिणीच्या भावानेच केला घात, गुंगीचं औषध देऊन….

शरद पवारांनी अनिकेत देशमुख यांना रात्री तातडीने बारामतीला बोलावून घेत त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर अनिकेत देशमुख यांनी धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची घोषणा केली. तसेच माळशिरसचे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) हे देखील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश आहेत.

Dhairyashil Mohite Patil । लोकसभेपूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तम जानकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असून जानकर यांच्यासोबत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातील अनेक बडे नेते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. लोकसभेपूर्वी महायुतीला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याचा परिणाम निवडणुकीवर काय होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Pankaja Munde । प्रथमच पंकजा मुंडेंची जरांगे पाटलांवर जहरी टीका, म्हणाल्या; “उपोषण करून काहीही…”

Spread the love