Budget Session । फसवणूक नको, आरक्षण द्या; विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

Budjet Session

Budget Session । आजपासून (२६ फेब्रुवारी) राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वांचे या अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर लक्षवेधी आंदोलन केलं आहे.

Ajit Pawar । ‘अपघातानेच मी राजकारणात…’, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. फसवणूक नको, आरक्षण द्या, असं म्हणत विरोधकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध, अशा देखील घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत.

Maratha Reservation । खळबळजनक! मराठा आंदोलनामागे शरद पवारांचा हात; कोणी केला गंभीर आरोप?

जरांगे पाटलांना कोण छळतंय, अशा पाट्या विरोधकांनी हातात घेतल्या आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते उपस्थित होते. दरम्यान, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकूण ५ दिवस चालणार असून या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

Ajit Pawar । भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी का केली? 9 महिन्यांनंतर अजित पवार यांनी सांगितलं खरं कारणं

Spread the love