Pune Crime News । पुणे पुन्हा हादरलं! जंगलात नेऊन नवऱ्याने बायकोसोबत केले भयानक कृत्य; घटना वाचून बसेल धक्का

Pune Crime News

Pune Crime News । पुणे : नवरा-बायकोचे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असतात. (Crime News) अनेकदा ही भांडणे खूप टोकाला जातात. अनेकदा नवरा-बायकोच्या भांडणात पोलिसांना मध्यस्थी करावी लागते. काही भांडणे ऐकून बऱ्याचवेळा आपल्या पायाखालची जमीन सरकते. (Crime) सध्या अशीच एक घटना घडली आहे. (Latest marathi news)

Budget Session । फसवणूक नको, आरक्षण द्या; विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. जंगलात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला आहे. पत्नीच्या हत्येनंतर पतीने देखील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक- बे परिसरात ही घटना घडली आहे. सोमनाथ सखाराम वाघ आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

Manoj Jarange Protest । ब्रेकिंग! ‘या’ तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा १० तास राहणार बंद; जालन्यातील बससेवाही बंद

या घटनेचे कारण समजू शकले नाही. घटनेनंतर उत्तमनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, सकाळी 11 वाजल्यापासून घरी गेलेले आई बाबा परत आले नाहीत म्हणून मुली आणि पुतण्याने त्यांचा शोध घेतला. संध्याकाळच्या सुमारास त्यांना त्यांची दुचाकी पिकॉक बे परिसरात सापडली. परिसरात आणखी शोध घेतला असता पोलिसांना दोघांचे मृतदेह सापडले.

Ajit Pawar । ‘अपघातानेच मी राजकारणात…’, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Spread the love