Ajit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पाडल्यानंतर त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. शरद पवारांनीही (Sharad Pawar) हार न मानता नवीन पक्ष स्थापन केला आहे. दरम्यान, अजित पवारांवर शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणल्याचा उल्लेख सतत विरोधकांकडून केला जातोय. (Latest Marathi News)
Maratha Reservation । खळबळजनक! मराठा आंदोलनामागे शरद पवारांचा हात; कोणी केला गंभीर आरोप?
विरोधकांच्या टीकेला अजित पवारांनी आता एका पत्रातून प्रत्युत्तर दिले आहे.(Ajit Pawar vs Sharad Pawar) “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप आणि शिवसेनेसोबत जाताना वेगळा विचार केला. त्याबाबत अनेक माध्यमातून आजही चर्चा होत आहे. याबाबत माझी नेमकी भूमिका” असं म्हणत अजित पवारांनी शेअर केलेल्या पत्रामध्ये 1991 साली आपण राजकारणात अपघातानेच आलो आहे, असे म्हटले आहे.
Ajit Pawar । भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी का केली? 9 महिन्यांनंतर अजित पवार यांनी सांगितलं खरं कारणं
जरी अजित पवारांनी शरद पवारांचा उल्लेख या पत्रात केला नसला तरी त्यांचा इशारा शरद पवारांच्याच दिशेने आहे, असे तरी या पत्रातील मजकुरावरुन स्पष्ट होत आहे. 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल केली. त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची गरज होती. त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर त्या संधीची सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला. इतर सर्व जाबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत समाजकारणासाठी स्वत:ला वाहून घेतले,” असं अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.