Vijay Wadettiwar । मराठा समाज (Maratha reservation) ओबीसींमधून (OBC) आरक्षण मिळावं आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आंदोलन करत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना अशातच आता काँग्रेस नेते विजय वड्डेटीवारांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे. (Latest marathi news)
सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे आणि आता हे सर्वांसमोर आले आहे. राज्य सरकारने जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारं आरक्षण दिल आहे. मराठा समाजालाही हे कळून चुकलं आहे. तोच रोश आता मराठा समाजाचा सत्ताधाऱ्याच्या विरोधात आहे. मतदारावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय यापूर्वीही या सरकारने घेतले आहेत, असा आरोप विजय वड्डेटीवारांनी केला आहे.
“त्यामुळे माझी मराठा समाजाला विनंती आहे की, असे उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्या आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणुकीत मतदान करा. उमेदवार उभे करणे, मनातील राग काढण्यासाठी लोकशाहीसाठी योग्य राहणार नाही”, असे आता आवाहन विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला केलं आहे.
Accident News । लग्नसोहळा आटोपून परतताना काळाचा घाला! 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी