Dhairyashil Mohite Patil । लोकसभेपूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का

Dhairyashil Mohite Patil

Dhairyashil Mohite Patil । आजपासून पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) खूप चर्चेत येत आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच धैर्यशील मोहिते पाटलांना मोठा धक्का बसला आहे.

Pankaja Munde । प्रथमच पंकजा मुंडेंची जरांगे पाटलांवर जहरी टीका, म्हणाल्या; “उपोषण करून काहीही…”

कारण महाविकास आघाडीत असलेले शेकापचे नेते अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांनी देखील अपक्ष अर्ज भरला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर केल्यांनतर अनिकेत देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली होती. “आम्ही दुधखुळे नाही. प्रत्येकवेळी एकंदरीत सगळ्यांना अंधारात ठेवून या गोष्टी घडल्या आहेत. हा आमच्यासाठी राजकारणातील धडा आहे,” असे अनिकेत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Madha Lok Sabha । शरद पवारांचा शिंदे गटाला मोठा धक्का, बडा नेता करणार पक्षात प्रवेश

दरम्यान, दिवंगत आमदार गणपत देशमुख यांचे नातू असलेले अनिकेत देशमुख हे शेकापचे युवा नेते असून २०१९ च्या सांगोला विधानसभेतून त्यांना केवळ ७०० मतांनी पराभव सहन करावा लागला होता. अशातच आता अनिकेत देशमुख माढा लोकसभा निवडणुक लढवणार आहेत. पण अनिकेत देशमुख यांनी अपक्ष अर्ज भरल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांना धक्का बसला आहे.

Baramati Loksabha । अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता, समोर आली महत्त्वाची माहिती

Spread the love