Sharad Pawar । ब्रेकिंग! माजी मुख्यमंत्र्याने तुतारीवर निवडणूक लढायला दिला नकार

Sharad Pawar

Sharad Pawar । महाविकास आघाडीतला सातारा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा पेच अजून कायमच आहे. श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याठिकाणी शरद पवार कोणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. श्रीनिवास पाटील (Srinivas Patil) यांनी नकार दिल्यामुळे शरद पवार यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव दिला.

Bacchu Kadu । बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना केलं कळकळीचं आवाहन, म्हणाले; “माझ्या मायची शपथ…”

मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिकीटावरच लढण्याची भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या जागेचा पेच अजूनच वाढला आहे. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) साताऱ्यातून तुतारीवर निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. मात्र त्यांनी देखील नकार दिल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis । फडणवीसांचे खळबळजनक विधान, म्हणाले; “पवारसाहेब आपल्या पाठिशी”

दरम्यान, शरद पवार यांनी पाच जागेवर उमेदवार जाहीर केली आहे. शरद पवार यांच्या पक्षाने बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे आणि वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी दिली आहे, तर दिंडोरीतून भास्करराव भगरे आणि अहमदनगरमधून नीलेश लंके यांना तिकीट दिले आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांच्यासाठी समोर आली सर्वात धक्कादायक बातमी!

Spread the love