Maharashtra Election । शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का! स्टार प्रचारकावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

Maharashtra Election । निवडणुकीपूर्वी (Loksabha election) सत्तेत असलेले अनेक नाराज राजकीय नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षाला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पण आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest marathi news)

Eknath Shinde । शिंदे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने दिला राजीनामा

पक्षाचे स्टार प्रचारक असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आदर्श आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्टार प्रचारक किंवा बाहेर जिल्ह्यातील नेत्यांना मतदारसंघातून ४८ तास अगोदर जाण्याचे संकेत असूनही अनिल देशमुख यांनी शुक्रवारी वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे भेट दिली.

Nasim Khan । निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का! स्टार प्रचारकाने दिला राजीनामा

दुपारी साडेचार ते पावणे पाच दरम्यान अनिल देशमुखांनी हिंगणघाटच्या नंदोरी चौकातील नागरिकांची भेट घेतली होती. दरम्यान, हिंगणघाटचे विस्तार अधिकारी सुभाष टाकळे यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Koyta Gang । पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ! 5 रिक्षा, 15 ते 20 दुचाकी, कारची केली तोडफोड

Spread the love