Ganpat Gaikwad Case Update । मोठी बातमी! आमदार गणपत गायकवाड गोळीबारप्रकरणी पोलिसांच्याही अडचणीत वाढ

Ganpat Gaikwad

Ganpat Gaikwad Case Update । भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह अन्य शिवसैनिकांवर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात महिलांचा तुफान राडा; पोलिसांनी दिला महिलांना चोप; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी पोलिसांच्या देखील अडचणी देखील वाढल्याची माहिती मिळत आहे. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळाबारप्रकरणी आता हिललाइन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची विभागीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कुठे कमी पडले? दोन्ही गटांचे समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये कसे आले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

Ganpat Gaikwad । मोठी बातमी! आमदार गणपत गायकवाड यांनी केला अन्नत्याग

त्याचबरोबर महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड हे दोघेही एकाच दालनात असताना त्या ठिकाणी पोलीस अधिकारी उपस्थित का नव्हते? पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्हीचे फुटेज तातडीने माध्यमांमध्ये प्रसारित कसे झाले? असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात उपस्थित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.

Cabinet Dicision । शेतकऱ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत… शिंदे सरकारने घेतले मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Spread the love