Ajit Pawar । निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसणार? शिवसेनेचा ‘तो’ मेसेज व्हायरल

Ajit Pawar

Ajit Pawar । लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आता या दोघांमध्ये तिसऱ्या उमेदवाराची देखील एंट्री झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी तिहेरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना नेते माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा दावा केला आहे.

Topers Ad

Car Accident । होळीच्या दिवशी मोठा अनर्थ घडला, कारचा भीषण रस्ता अपघात, माय-लेकींसह 3 जणांचा मृत्यू

शिवतारे आणि अजित पवार यांची राजकीय दुश्मनी असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे. मात्र यामध्येच आता अजून एक भर पडली आहे. बारामती मतदारसंघातील खडकवासला या ठिकाणाहून एक मेसेज व्हायरल होत आहे. सध्या हा मेसेज सगळीकडे चर्चेत आहे. या मेसेज मध्ये इतर कोणत्याही पक्षाला शिवसेनेची गरज नसल्याचे लिहिण्यात आले आहे. सध्या या मेसेजची सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर या मेसेजमुळे आता अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fdanavis । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर; रात्री उशिरा फडणवीसांच्या घरी…

सुनेत्रा पवार यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विरोध

सध्या व्हायरल होत असलेल्या मेसेज मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करायचा नसून पुणे लोकसभेतील मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करूयात असा मेसेज शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना येत आहे. हा मेसेज शिवसेनेच्या एका व्हाट्सअप ग्रुप वर आला आहे. खडकवासला मतदारसंघातील शिवसेनेला विचारात घेत नसल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला जात आहे.

Nokia 3210 । बाजारात पुन्हा होणार Nokia च्या ‘या’ फोनची धमाकेदार एन्ट्री, मिळणार 108MP कॅमेरा

Spread the love