Nokia 3210 । बाजारात पुन्हा होणार Nokia च्या ‘या’ फोनची धमाकेदार एन्ट्री, मिळणार 108MP कॅमेरा

Nokia 3210

Nokia 3210 । नोकिया ही देशातील सर्वात जुनी मोबाइल कंपनी आहे. जवळपास प्रत्येक घरात पूर्वी Nokia चे (Nokia) फोन असायचे. हटके लूक आणि टिकायला चांगला असल्याने त्याकाळी या Nokia च्या फोनला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी होती. कंपनीचा 3210 हा फीचर सर्वांकडे असायचा. पण कालांतराने Nokia चा हा फोन मार्केटमधूनच गायब झाला होता. (Nokia upcoming phone)

Topers Ad

Congress । चंद्रपुरात काँग्रेसचा उमेदवार ठरला! वडेट्टीवार नाही तर सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढणार ‘हा’ उमेदवार

Nokia 3210

अशातच आता कंपनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या फोनची बाजारात पुन्हा एकदा दमदार एंट्री होणार आहे. (Nokia 3210 Launch in India) याबाबत या कंपनीचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD ग्लोबल कंपनीने (HMD Global Company) माहिती दिली असून या फोनमध्ये 108MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. HMD ग्लोबल कंपनीने सोशल मीडियावर (Social media) याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

JP Nadda | धक्कादायक बातमी! भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला

“आज माझा वाढदिवस असून एक आयकॉन लवकरच परत येणार आहे,” अशा आशयाची पोस्ट HMD ग्लोबल कंपनीने 18 मार्च रोजी केली होती. यासोबतच नोकिया फोन्स असा हॅशटॅग देखील HMD ग्लोबल कंपनीने वापरला आहे. असे असले तरी ही पोस्ट कोणत्या मॉडेलबद्दल असेल, याची कोणतीही माहिती स्पष्टपणे कंपनीकडून देण्यात आली नाही.

Solapur Politics News । राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे, सोलापूरच्या राजकारणात हाय व्होल्टेज सामना

18 मार्च 1999 रोजी बाजारात Nokia चा 3210 हा स्मार्टफोन लाँच केला होता. त्यामुळे आता हाच फोन नवीन स्वरुपात भारतात पुन्हा लाँच होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहेत. या फोनचं नाव 3210 असेल की दुसरं काही याबाबत कोणीतही माहिती समोर आली नाही. विशेष म्हणजे या फोनमध्ये तब्बल 108MP कॅमेरा दिला जाईल.

Bjp । भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याचा पत्ता कट; उमेदवारी देणं टाळलं

Spread the love