Car Accident । होळीच्या दिवशी मोठा अनर्थ घडला, कारचा भीषण रस्ता अपघात, माय-लेकींसह 3 जणांचा मृत्यू

Car Accident

Car Accident । सध्या सगळीकडे होळीचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी होळी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. मात्र सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहारमधील बेगुसराय या ठिकाणी एक रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आई आणि मुलीसह तिघांचा मृत्यू झाला, तर जखमींमध्ये वडील, मुलगा आणि चालकाचा समावेश आहे. या अपघातामुळे सगळीकडे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Devendra Fdanavis । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर; रात्री उशिरा फडणवीसांच्या घरी…

Topers Ad

Devendra Fdanavis । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर; रात्री उशिरा फडणवीसांच्या घरी…

सणासुदीच्या काळातच हा अपघात झाला आहे. यामुळे सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. होळीच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब मुजफ्फरपूरहून जमुईला जात होते. दरम्यान, स्विफ्ट डिझायर कार नियंत्रणाबाहेर जाऊन खड्ड्यात पलटी झाली आणि हा भीषण अपघात झाला आहे.

Nokia 3210 । बाजारात पुन्हा होणार Nokia च्या ‘या’ फोनची धमाकेदार एन्ट्री, मिळणार 108MP कॅमेरा

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी सुधीर कुमार यांची पत्नी अर्चना देवी आणि त्यांची मुलगी नम्रता कुमारी अशी मृतांची नावे आहेत. सुधीर कुमार आणि त्यांचा मुलगा ओम कुमार यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

JP Nadda | धक्कादायक बातमी! भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला

Spread the love