Raju Parve Resign । काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राजू पारवे यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

Raju Parve Resign

Raju Parve Resign । राजकीय घडामोडींचा वेग आला असून राज्याच्या राजकारणात दररोज मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगणे कठीण आहे. दरम्यान, उमरेड मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन रविवारी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या विरोधात उभे केले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Topers Ad

Ajit Pawar । निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का बसणार? शिवसेनेचा ‘तो’ मेसेज व्हायरल

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राजू पारवे यांनी आपली प्रतिक्रिया देत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजू पारवे म्हणाले की, “पक्षातील हुकूमशाहीमुळे मी काँग्रेस सोडली. हे मी प्रदेशाध्यक्षांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणतीही कारवाई झाली नाही.” असं ते म्हणाले आहेत.

Car Accident । होळीच्या दिवशी मोठा अनर्थ घडला, कारचा भीषण रस्ता अपघात, माय-लेकींसह 3 जणांचा मृत्यू

दरम्यान, रामटेकमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते.

Devendra Fdanavis । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर; रात्री उशिरा फडणवीसांच्या घरी…

Spread the love