Devendra Fdanavis । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर; रात्री उशिरा फडणवीसांच्या घरी…

Devendra Fdanavis

Devendra Fdanavis । लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha election) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राजकीय पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. अनेक बड्या नेत्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून डावलले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी देखील वाढली आहे. अशातच आता राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)

Topers Ad

Nokia 3210 । बाजारात पुन्हा होणार Nokia च्या ‘या’ फोनची धमाकेदार एन्ट्री, मिळणार 108MP कॅमेरा

काल रात्री उशिरा उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे उपस्थित होते. अबकी बार 400 पारचा नारा दिला असून त्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावली होती, अशी माहिती भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिली.

Delhi Crime । धक्कादायक घटना! भरदिवसा तरुणीवर चाकूने हल्ला

“मागील अनेक वर्षांपासूनचे विषय होते. या निवडणुकीला सामोरे जायची इच्छा होती. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने, नेतृत्वाने उमेदवारीचा जो निर्णय घेतला, तो मान्य असून त्या जागेसाठी इच्छुक होतो. आता सर्व अडचणीचं निराकरण झालं आहे. माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली. सकारात्मक बैठक झाली”, असं राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

Congress । चंद्रपुरात काँग्रेसचा उमेदवार ठरला! वडेट्टीवार नाही तर सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात लढणार ‘हा’ उमेदवार

Spread the love