Ajit Pawar । अजितदादांचा दिलदारपणा! अपघातग्रस्ताला पाहताच गाडी थांबवली आणि…

Ajit Pawar

Ajit Pawar । बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या कामाची पद्धत अनेकांनी अनुभवली आहे. समजा एखादे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर ते अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरतात. पण सध्या अजित पवारांचा एक वेगळाच चेहरा सगळ्यांना पाहायला मिळत आहे. (Latest marathi news)

Uddhav Thackeray । “त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते”, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

अजित पवार बारामतीहून सोनगावकडे निघाले असताना रामभाऊ तावरे (Rambhau Taware) यांच्या दुचाकीची कारला धडक बसली. या अपघातानंतर तावरे खाली पडले. त्यावेळी अजित पवार यांनी आपली गाडी थांबवण्याच्या सूचना चालकाला दिल्या. ते स्वत: गाडीतून खाली उतरून जखमी व्यक्तीला ताफ्यातील लोकांसोबत मदत करु लागले. जखमी व्यक्तीला पाहताच त्यांनी त्यांना ओळखले.

Mumbai Crime । गेल्या 10 वर्षांपासून आजोबां करत होते मुलीसोबत नको ते कृत्य; अखेर तिने सांगितले सत्य नंतर कुटुंबीयांनी…

विशेष म्हणजे अजित पवारांनी तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत रामभाऊ तावरेंना बसवले. तसेच त्यांच्यासोबत आपल्या काही लोकांना दवाखान्यात पाठवले. डॉक्टरांनाही त्यांनी तशा सूचना दिल्या. क्षणाचाही विलंब न लावता अजित पवारांनी दाखवलेली ही तत्परता सर्वांना भावली. लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) प्रचार सुरु असताना त्यांनी पुढील दौऱ्याकडे न पाहता मदत केल्याने सध्या त्यांची चांगलीच चर्चा होत आहे.

Gurugram Video । क्षणात झालं होत्याच नव्हतं! स्मशानाची भिंत कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Spread the love