Uddhav Thackeray । “त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते”, उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । महाविकास आघाडीने राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीचे नेते आपापल्या मतदारसंघात प्रचार सभा घेताना दिसत आहेत. नुकतीच दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई (Anil Desai) यांच्या प्रचारार्थ शनिवारी मुंबईतील अँटॉप हिल येथे प्रचारसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. (Latest marathi news)

Gurugram Video । क्षणात झालं होत्याच नव्हतं! स्मशानाची भिंत कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडीओ

“मातोश्रीमधील ज्या खोलीला तुम्ही कुठली तरी खोली म्हणत आहात, ती बाळासाहेबांची खोली आहे. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. त्याच खोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) बाळासाहेबांसमोर नाक रगडायला आले होते. त्यावेळी अमित शहा यांनी फडणवीस यांना प्रवेशही दिला नव्हता, असा दावाही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Manoj Jarange Patil । जरांगे पाटलांचे सर्वात मोठे वक्तव्य; सरकारला दिला हा गंभीर इशारा

“देवेंद्र फडणवीस (Vendra Fadnavis) मला भ्रमिष्ठ म्हणाले. पण मी भ्रमिष्ठ आहे की नाही याचा निर्णय जनता घेईल. फडणवीस, जनाची नाही तरी मनाची ठेवा.लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. आज तुमच्यासमोर लोकांनी रान पेटवले आहे, तुमच्या चेल्यांना गावबंदी केली आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या सभेदरम्यान काँग्रेसचे नेते भाई जगताप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राखी जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Pankaj Tripathi । अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे झाले अपघातात निधन

Spread the love