Gurugram Video । क्षणात झालं होत्याच नव्हतं! स्मशानाची भिंत कोसळल्याने ४ जणांचा मृत्यू; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Gurugram Video

Gurugram Video । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्मशानभूमीची भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून चार जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी पुन्हा महाविकास आघाडीला मोठा धक्का! ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्राममधून हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. सायबर सिटीच्या मदनपुरी रोडवरील रामबाग परिसरात ही घटना घडली. यामुळे त्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली आहे. येथे स्मशानभूमीच्या शेजारील भिंत कोसळल्याने स्मशानभूमीजवळ बसलेले सहा लोक जखमी झाले. तर ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान घडली.

Rohit Pawar । “अजित पवारांना भाजपनं लोकल नेता बनवलं,” रोहित पवारांची जहरी टीका

स्मशानभूमीलगत असलेल्या वसाहतीतील काही लोक शनिवारी सायंकाळी रामबागच्या भिंतीजवळ बसले होते. यावेळी तेथे काही मुले खेळत होती. दरम्यान, रामबागची भिंत अचानक कोसळली आणि काही लोक व लहान मुले त्याखाली पडली. स्थानिक लोकांनी तातडीने ढिगारा उचलण्यास सुरुवात केली आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना रुग्णालयात नेले.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी मला…”

Spread the love